Ad will apear here
Next
खासदार तडस यांनी घेतली नितीन गडकरी यांची सदिच्छा भेट
वर्धा : केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे जलसंधारण, नदीविकास व गंगा संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी नव्याने आल्याने खासदार रामदास तडस यांनी त्यांची नागपूर निवासस्थानी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.

चार सप्टेंबरला झालेल्या भेटीदरम्यान अनौपचारिक चर्चेमध्ये वर्धा लोकसभा मतदार क्षेत्रातील महामार्ग विकास कामे, केंद्रीय मार्ग निधी योजनेतील विकास कामे, सिंदी रेल्वे येथील ड्रायपोर्ट या सोबतच केंद्र शासनाच्या माध्यमातून पुरस्कृत असलेला निम्न वर्धा सिंचन प्रकल्पातील कामे आदी विषयावर विचार विनिमय झाला.

‘महामार्ग क्षेत्रात व शिपिंग मंत्रालयातर्फे गडकरींच्या नेतृत्त्वात ज्या प्रकारे अभूतपूर्व विकास झाला त्याच धर्तीवर सिंचन क्षेत्रात व गंगा नदी स्वच्छतेमध्ये देखील फार मोठा सकारात्मक बदल दिसेल व कामे वेगाने पूर्ण होतील,’ असा विश्वास खासदार तडस यांनी व्यक्त केला.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZULBG
Similar Posts
गडकरी यांच्या जन्मदिनानिमित्त रक्तदान शिबीर नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ६१व्या जन्मदिनानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर या शिबिरात रक्तदान करावे, असे आवाहन पक्षातर्फे करण्यात आले आहे. शिबिरातील रक्ताचे संकलन डॉ. हेडगेवार रक्तपेढीकडून करण्यात येणार आहे
पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी ४४ हजार ईव्हीएम, २० हजार व्हीव्हीपॅट यंत्रे सज्ज मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी महाराष्ट्रातील सात मतदारसंघामध्ये ११ एप्रिल २०१९ रोजी मतदान होत आहे. आठवडाभरावर आलेल्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणेची जय्यत तयारी सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी एकूण ११६ उमेदवार आहेत. सात मतदारसंघात १४ हजार ९१९ मतदान केंद्रे आहेत, तर एक कोटी ३० लाख ३५ हजार मतदार आहेत
सेवाग्राम, सिंदी रेल्वे येथे पायाभूत सुविधांचा लोकार्पण सोहळा सेवाग्राम : केंद्र शासनाच्या रेल्वे बजेटमध्ये वर्धा लोकसभेसाठी मंजूर असलेल्या पायाभूत सुविधांचा लोकार्पण सोहळा वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. सेवाग्राम येथे अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या आवागमन करत असतात. त्यातून प्रवास करणाऱ्या वृद्ध व दिव्यांग व्यक्तींना लिफ्टअभावी त्रास
पंतप्रधानांनी घेतली खासदार तडस यांच्या तिरंगा यात्रेची दखल वर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रामदास तडस यांनी या वर्षीही तिरंगा यात्रेचे उत्कृष्ट आयोजन केले. वरुड शहर ते बेनोडा शहीद यादरम्यान काढण्यात आलेल्या या यात्रेची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:च्या ट्विटर अकाउंटवरून संपूर्ण जगाला दिली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language